LLB 3 वर्षे, B.Ed, M.Ed, M.PEd प्रवेश परीक्षा सीईटी अर्ज नोंदणीला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

राज्य सीईटी सेल कार्यालयाला उमेदवार आणि पालकांकडून एलएलबी/ बी.एड/ एम.एड आणि एम.पी. एड अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली होती.  त्या अनुषंगाने परीक्षा परिषदेकडून उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून, वरील अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता उमेदवारांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार आहे. 

LLB 3 वर्षे, B.Ed, M.Ed, M.PEd प्रवेश परीक्षा सीईटी अर्ज नोंदणीला 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्य सामाईक परीक्षा परिषदेमार्फत (State Common Examination Council) एलएलबी ३ वर्षे/ बी.एड/ एम.एड आणि एम.पी. एड या अभ्यासक्रमासाठी (LLB 3 years/ B.Ed/ M.Ed and M.P. Ed courses) घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ (Extension of deadline for entrance exam application) देण्यात आली आहे. राज्य सीईटी सेल कार्यालयाला उमेदवार आणि पालकांकडून एलएलबी/ बी.एड/ एम.एड आणि एम.पी. एड अभ्यासक्रमासाठी अर्ज भरण्याची मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली होती.  त्या अनुषंगाने परीक्षा परिषदेकडून उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून, वरील अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता उमेदवारांना २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार (Candidates can register their applications till February 28) आहे. 

एलएलबी/ बी.एड/ एम.एड आणि एम.पी. एड या अभ्यासक्रमाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत राबवण्यात येणाऱ्या परीक्षेच्या नोंदणी अर्जासाठी मुदतवाढ  देण्यात आली आहे. एम.एड व एम.पी. एड या अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीसाठी यापूर्वी देण्यात आलेली मुदत १० फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. तर   एलएलबी ३ वर्षे व बी.एड या अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीची मुदत उद्या १३ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आहे. त्यानंतर आता सीईटी सेलकडून २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ (Extension until March 20) देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप अर्ज नोंदणी न करू शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. 

ज्या विद्यार्थ्यांना एलएलबी ३ वर्षे/ बी.एड/ एम.एड आणि एम.पी. एड या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेयचा आहे त्यांना सीईटी प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. त्यानुसार  विविध व्यावसायिक, तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सामायिक प्रवेश परीक्षांसाठीच्या अर्ज नोंदणीला २५ डिसेंबरपासून सुरुवात करण्यात आली आहे. 

यामध्ये एलएलबी ३ वर्षे/ बी.एड/ एम.एड आणि एम.पी. एड या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद आणि काय तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन तसेच उमेदवारांच्या शैक्षणिक हिताचा विचार करून सीईटी सेलने वरील अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन नोंदणी आणि अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.  या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना दिलेल्या मुदतीत https://cetcell.mahacet.org/ या कार्यालयीन संकेतस्थळावर भेट देऊन अर्ज भरून निश्चित करणे आवश्यक आहे. याची सर्व संबंधित उमेदवार व पालकांनी नोंद घ्यावी, असे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचना पत्रामध्ये म्हटले आहे.