शिक्षण विभागाचा बारा शाळांना दणका; पालकांनो, या शाळांपासून सावध...

पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड यांनी अनधिकृत बारा शाळांचे नावे प्रसिध्द केली आहे. आपण आपल्या पाल्यास सदर अनाधिकृत शाळामध्ये दाखल करु नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शिक्षण विभागाचा बारा शाळांना दणका; पालकांनो, या शाळांपासून सावध...
School Representative Image

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

मागील काही दिवसांपासून राज्यातील ८०० बोगस शाळांबाबत (Bogus Schools) चर्चा सुरू असताना पुण्यातून एक मोठी माहिती समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या (Pune Zilla Parishad) कार्यक्षेत्रातील बारा शाळांना अनधिकृत ठरविण्यात आले असून त्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. या शाळांमध्ये प्रवेश घेऊन नये, असे आवाहनही शिक्षण विभागाकडून (Education Department) करण्यात आले आहे. (Unauthorized schools in Pune)

राज्यातील अनिधकृत शाळांबाबत शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी नुकतेच सर्व शिक्षण उपसंचालकांना पत्र पाठवून अनधिकृत शाळांचा शोध घेत कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक शाळांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. काही शाळांनी बोगस कागदपत्रे तयार करून शासनाची फसवणूक केल्याचेही तपासात समोर आले आहे.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

या घडामोडी घडत असतानाच पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) संध्या गायकवाड यांनी अनधिकृत बारा शाळांचे नावे प्रसिध्द केली आहे. आपण आपल्या पाल्यास सदर अनाधिकृत शाळामध्ये दाखल करु नये. याबाबत स्वतः पालकांनी खबरदारी घ्यावी. पालकांना या संदर्भात अधिक काही शंका समाधान हवे असल्यास त्यांनी स्थानिक पंचायत समिती कार्यालय गटशिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत शाळा

  • श्री. मंगेश मेमोरीयल एज्युकेशन सोसायटी पुणे श्री मेमोरीयल इंटरनॅशनल स्कूल. दौड
  • सौ. प्रतिभाताई गायकवाड प्रतिष्ठानमा क्रेयांस प्रि प्रायमरी स्कूल, कासुर्डी, ता. दौंड
  • विद्यार्थी विचार प्रतिष्ठान, के के इंटरनॅशनल स्कूल, गट नं. २४१. स्ट्रीट रोड, बेटवाडी, ता. दौंड
  • पुणे इंटरनॅशनल पब्लिक स्कूल, अष्टापूर मळा, लोणीकाळभोर, ता. हवेली
  • जयहिंद पब्लिक स्कूल भोसे, ता. खेड
  • एस. एन. बी. पी. टेक्नो स्कुल, बावधन, ता. मुळशी
  • अंकुर इंग्लिश स्कुल, जांभे / सांगावडे, ता. मुळशी
  • श्री साई बालाजी पब्लिक स्कूल, दत्तवाडी, नेरे, ता. मुळशी
  • श्रीनाथ इंग्लिश मिडीयम स्कूल, वीर, ता. पुरंदर
  • कल्पवृक्ष इंग्लिश मिडीयम स्कुल, किरकटवाडी, ता. हवेली
  • क्रेझ इंग्लिश मिडीयम स्कुल, कोल्हेवाडी, ता. हवेली
  • किंडर गार्डन इंग्लिश मिडीयम स्कुल, खडकवासला, ता. हवेली