आईसीएआई सीए फाउंडेशन परीक्षेचे हॉल तिकिट प्रसिद्ध
अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी दि. 5 जून रोजी प्रवेशपत्रे जारी केली आहेत. उमेदवार icai.org या अधिकृत वेबसाइटवरुन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सीए (CA) फाउंडेशनच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) ने चार्टर्ड अकाउंटंट (CA) फाउंडेशन कोर्सच्या जून 2024 सत्राच्या परीक्षेत बसण्यासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी दि. 5 जून रोजी प्रवेशपत्रे जारी केली आहेत. उमेदवार icai.org या अधिकृत वेबसाइटवरुन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर त्यावर दिलेले तपशील (नाव, आई/वडिलांचे नाव, जन्मतारीख, फोटो इ.) तपासावेत. यामध्ये काही त्रुटी असल्यास, उमेदवारांनी ICAI च्या विद्यार्थी हेल्पलाइनशी संपर्क साधावा.
यापूर्वी ICAI ने CA फाउंडेशन जून 2024 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले होते. संस्थेने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, फाउंडेशन कोर्सच्या परीक्षा 20, 22, 24 आणि 26 जून 2024 रोजी घेतल्या जातील.
उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी icai.org या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. यानंतर, या वेबसाइटच्या विद्यार्थी विभागात दिलेल्या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर नवीन पेजवर विद्यार्थ्यांना त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख तपशील भरून सबमिट करावा लागेल. यानंतर, विद्यार्थी स्क्रीनवर त्यांचे प्रवेशपत्र (ICAI CA Foundation Admit Card 2024) पाहू शकतील. त्याची प्रिंट घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी सॉफ्ट कॉपीही जतन करावी.