हिंदुस्तान फर्टिलायझर्स अँड केमिकल्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
HURL ने पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी आणि इतर पदांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीद्वारे एकूण 212 पदांची नियुक्ती केली जाणार आहे. HURL ची भरती प्रक्रिया 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू राहील.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच डिप्लोमा अभियंता प्रशिक्षणार्थी पदांसाठी 18 ते 27 वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. सरकारी नियमांनुसार, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सवलत दिली जाणार आहे.