जर्मन नाटकासाठी ध्रुव ग्लोबलने पटकावले प्रथम पारितोषिक
आंतरशालेय जर्मन नाट्य स्पर्धेत (German Drama Competition)नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलने ‘शाश्वततेबद्दल टॉक शो’ (पथनाट्या) चे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटाकावले.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
‘शाश्वत’ या विषयाला अनुसरून ध्रुव ग्लोबल स्कूलच्या (Dhruv Global School) विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावले आहे . या नाटकास सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
गोएथे इन्स्टिट्यूट मॅक्स म्यूलर भवन, पुणे आणि एमईएस सिनियर कॉलेज, पुणे यांच्या तर्फे आयोजित आंतरशालेय जर्मन नाट्य स्पर्धेत (German Drama Competition)नांदे येथील ध्रुव ग्लोबल स्कूलने ‘शाश्वततेबद्दल टॉक शो’ (पथनाट्या) चे सादरीकरण करून प्रथम क्रमांक पटाकावले.
पुणे, कोल्हापूर आणि आष्टा येथील ९ शाळांमधील १५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. यामध्ये ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदे येथील ८ वीं ते १० वर्गातील १० विद्यार्थ्यांनी ‘शाश्वततेबद्दल टॉक शो’ चे सादरीकरण केले. या नाटकाचे सादरीकरण सई कुलकर्णी, शांभवी काळे, तनिश कांसारा, इशानवी बरपांडा, अचल गुप्ता, म्रिधीनी गुप्ता, खुशी देशमुख, ओवी सोंज, त्रिषा कोतलवाल आणि महिका पटवर्धन यांनी केले.अहीर यांनी रंगमंचासाठी मदत केली आहे.
जर्मन विभाग प्रमुख धनश्री महाजनी यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या शाश्वततेबद्दल टॉक शो चे विद्यार्थ्यांनी अप्रतिम सादरीकरण केले. या विद्यार्थी कलाकारांना शाळेतील जर्मन विभागाने पाठिंबा दिला.
प्राचार्या संगीता राऊत यांनी उल्लेखनीय यशासाठी टीम आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी जर्मन भाषेतील त्यांची प्रावीण्यता सिद्ध करत ध्रुव स्कूलचा गौरव वाढविला आहे.