'अग्निवीर एअर सिलेक्शन टेस्ट' परीक्षेच्या तारखांमध्ये बदल 

भारतीय वायुसेनेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता अग्निपथ वायु अग्निवीर इनटेक 02/2025 बॅचची परीक्षा 16 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. ही परीक्षा ऑनलाइन स्वरुपात घेतली जाणार आहे.

'अग्निवीर एअर सिलेक्शन टेस्ट' परीक्षेच्या तारखांमध्ये बदल 
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
अग्निवीर एअर सिलेक्शन टेस्ट (Agniveer Air Selection Test) Intake 02/2025 च्या परीक्षेची तारीख (Exam date changed) भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) बदलली आहे. यापूर्वी या भरतीसाठी 18 ऑक्टोबरपासून परीक्षा (exams) घेण्यात येणार होती. त्यात आता सुधारणा करण्यात आली असून भारतीय वायुसेनेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार आता अग्निपथ वायु अग्निवीर इनटेक 02/2025 बॅचची परीक्षा 16 नोव्हेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. (Now Exam is going to start from 16th November) ही परीक्षा ऑनलाइन (onlineस्वरुपात घेतली जाईल.

या भरती परीक्षेत बसण्यासाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांची प्रवेशपत्रे (Hallticket) परीक्षेच्या तारखेच्या काही दिवस आधी डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जातील. सर्व उमेदवार केवळ ऑनलाइन प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील, प्रवेशपत्र कोणत्याही उमेदवाराला पोस्ट किंवा इतर माध्यमातून पाठवले जाणार नाहीत, अशी माहिती भारतीय हवाई दलाकडून देण्यात आली आहे. 
 
ही भरती अग्निपथ योजनेंतर्गत केली जात असून अविवाहित पुरुष व महिला उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत विविध पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरतीतील निवड प्रक्रिया अनेक टप्प्यात होणार आहे. सर्व प्रथम उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेला बसावे लागेल. यानंतर शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PFT) आणि वैद्यकीय चाचणी केली जाईल. या सर्व टप्प्यात यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.