'या' भारतीय विद्वानावर अमेरिकेत दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या आरोप; अमेरिकेचा व्हिसा रद्द
श्रीनिवासन या कोलंबिया विद्यापीठातील डॉक्टरेटची विद्यार्थिनी आहेत. अमेरिकेच्या गृह सुरक्षा सचिव क्रिस्टी नोएम यांनी जाहीर केले की, "हिंसाचार आणि दहशतवादाचे समर्थन केल्याबद्दल ज्या कोलंबियन विद्यार्थिनीचा विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आला होता तिने CBP होम अॅप वापरून स्वतःला देशाबाहेर काढले आहे."

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉनल्ड ट्रंप (Newly elected US President Donald Trump) यांच्या नवीन धोरणांमुळे भारतीयांमध्ये नाराजीचा सुर आहे. अशातच आता अमेरिकेच्या संदर्भात आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेत भारतीय विद्वान अशी ओळख असलेल्या डॉ. रंजनी श्रीनिवासन (Indian scholar Dr. Ranjani Srinivasan) यांच्यावर अमेरिकेत हिंसाचार आणि दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या आरोप करत त्यांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. (visa has been revoked on charges of supporting violence and terrorism) त्यानंतर त्यांनी स्वेच्छेने देश सोडला आहे.
हिंसाचार आणि दहशतवादाला पाठिंबा दिल्याच्या आरोपावरून व्हिसा रद्द