CPCB ; विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध
या भरतीअंतर्गत अनेक महत्त्वाची पदे आहेत ज्यात शास्त्रज्ञ बी, सहाय्यक कायदा अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक पर्यवेक्षक, सहाय्यक, लेखा सहाय्यक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, अप्पर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लॅब असिस्टंट, लोअर डिव्हिजन लिपिक, फील्ड अटेंडंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ यांचा समावेश आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
इच्छुक उमेदवार २८ एप्रिल २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी विभागाच्या अधिकृत वेबसाइट cpcb.nic.in ला भेट देऊन पोर्टलवर अर्ज करू शकतात. या भरतीअंतर्गत अनेक महत्त्वाची पदे आहेत ज्यात शास्त्रज्ञ बी, सहाय्यक कायदा अधिकारी, वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक, वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक पर्यवेक्षक, सहाय्यक, लेखा सहाय्यक, कनिष्ठ अनुवादक, वरिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ तंत्रज्ञ, प्रयोगशाळा सहाय्यक, अप्पर डिव्हिजन लिपिक, डेटा एंट्री ऑपरेटर, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लॅब असिस्टंट, लोअर डिव्हिजन लिपिक, फील्ड अटेंडंट आणि मल्टी टास्किंग स्टाफ यांचा समावेश आहे.
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 1 तासाच्या परीक्षसाठी उमेदवारांना विहित शुल्क भरावे लागेल. ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना ५०० रुपये तर एससी, एसटी आणि सर्व श्रेणीतील महिला उमेदवारांना १५० रुपये शुल्क भरावे लागेल.
तसेच २ तासांच्या परीक्षेसाठी, सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी १००० रुपये आणि एससी, एसटी आणि सर्व महिला उमेदवारांसाठी २५० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
असा करता येईल अर्ज
* सर्वप्रथम उमेदवारांनी अधिकृत पोर्टलला भेट द्यावी.