CTET परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी CBSE चा मोठा निर्णय

ज्या उमेदवारांना त्यांचे  गुण  पत्रक त्यांच्या ओएमआर शीट सोबत पडताळून पहायची आहे,  ते उमेदवार  १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात.  ज्या उमेदवारांनी यापूर्वी माहिती अधिकार कायदा २०२५ अंतर्गत अर्ज केला आहे ते ५०० रुपये शुल्क भरून नवीन पद्धतीने अर्ज करू शकतात.

CTET परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी CBSE चा मोठा निर्णय

एज्युवार्ता न्यूज  नेटवर्क 

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (Central Board of Secondary Education) CBSE ९ जानेवारी रोजी सीटीईटी डिसेंबर २०२४ चा निकाल जाहीर केला होता. ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे. सीबीएसईने डिसेंबर २०२४ मध्ये झालेल्या सीटीईटी परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना ओएमआर शीट्स देण्याचा निर्णय घेतला आहे. (It has been decided to provide OMR sheets to the candidates appearing for the CTET exam) इच्छुक उमेदवार त्यांची ओएमआर शीट विहित शुल्क जमा करून मिळवू शकतात. 

बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, 'ज्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक त्यांच्या ओएमआर शीटसोबत पडताळून पहायची आहे,  ते उमेदवार १६ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करू शकतात. ज्या उमेदवारांनी यापूर्वी माहिती अधिकार कायदा २०२५ अंतर्गत अर्ज केला आहे ते ५०० रुपये शुल्क भरून नवीन पद्धतीने अर्ज करू शकतात.

ओएमआर शीटची प्रत असलेले गुणपत्रक कोणत्याही संस्थेला किंवा शाळेला प्रदर्शनासाठी, व्यावसायिक कारणासाठी किंवा प्रिंट मीडियासाठी प्रदान केली जाणार नाही. उमेदवाराच्या नावाने दुसऱ्याने सादर केलेला अर्ज आणि अपूर्ण अर्ज कोणत्याही संदर्भाशिवाय त्वरित नाकारले जातील, असा इशाराही बोर्डाने आपल्या निवेदनात दिला आहे. 

विहित शुल्क "सचिव, सीबीएसई, दिल्ली" या नावाने बँक ड्राफ्टद्वारे जमा करावे लागेल. अर्जात, उमेदवाराचे नाव, रोल नंबर, पत्ता स्पष्टपणे लिहिलेला असावा. याव्यतिरिक्त, बँक ड्राफ्टच्या मागील बाजूस रोल नंबर आणि नाव देखील नमूद करणे आवश्यक आहे. अर्ज मिळाल्यानंतर ओएमआर शीट दिली जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.