आईने मोबाईल पाहण्यापासून रोखले म्हणून २०व्या मजल्यावरून उडी मारत मुलीची आत्महत्या!
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या वेळी मोबाईल वापरल्याबद्दल मुलीच्या आईने तिला फटकारले होते, त्यानंतर तिने हे भयानक पाऊल उचलले. अवंतिकाचे कुटुंब मध्य प्रदेशचे होते. तिचे वडील अभियंता आहेत आणि आई गृहिणी आहे. अवंतिका एका खाजगी शाळेत शिकत होती.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
परीक्षा जवळ आली आहे मोबाइल पाहू नकोस अभ्यास कर, असा तगादा लावणार्या आईवर चिडून 15 वर्षांच्या मुलीने 20 व्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या (15-year-old girl commits suicide by jumping from 20th floor) केल्याची धक्कादायक घटना बंगळुरू (Bangalore) येथून समोर आली आहे. अवंतिका चौरसिया या १५ वर्षांच्या विद्यार्थिनीने २० व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. तिच्या आईने परीक्षेदरम्यान मोबाईल फोन वापरण्यास आक्षेप घेतला होता. (Her mother had objected to her using a mobile phone during the exam)
काल बुधवारी कडूगोडी पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या वेळी मोबाईल वापरल्याबद्दल मुलीच्या आईने तिला फटकारले होते, त्यानंतर तिने हे भयानक पाऊल उचलले. अवंतिकाचे कुटुंब मध्य प्रदेशचे होते. तिचे वडील अभियंता आहेत आणि आई गृहिणी आहे. अवंतिका एका खाजगी शाळेत शिकत होती. आधीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्यानंतर तिच्या आईने त्याला मोबाईल फोन वापरण्यास मनाई केली होती.
दरम्यान, १५ फेब्रुवारीपासून वार्षिक परीक्षा सुरू होणार होत्या, त्यामुळे आईला अवंतिकाने अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे वाटत होते. आईच्या फटकारामुळे संतापून अवंतिकाने आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. अवंतिका व्हाईटफील्ड परिसरातील सीबीएसई शाळेत शिकत होती.अवंतिकाच्या मृत्यूने पुन्हा एकदा मोबाईल फोनची क्रेझ अधोरेखित केली आहे.