नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजमध्ये Themisia 3.0 चे आयोजन 

आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात दिल्ली विद्यापीठ आणि नेपाळ लॉ कॅम्पसमधील नामांकित व्यक्ती मार्गदर्शन करतील.जजमेंट ॲनालिसिस स्पर्धेत संपूर्ण भारतातून 30 हून अधिक संघ सहभागी होत आहेत.

नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजमध्ये Themisia 3.0 चे आयोजन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (Deccan Education Society)श्री.नवलमल फिरोदिया लॉ कॉलेजतर्फे (Navalmal Firodia Law College) येत्या 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी Themisia 3.0 हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.त्यात आंतरराष्ट्रीय चर्चासत्र, आंतरमहाविद्यालयीन निकाल विश्लेषण स्पर्धा, कायदेशीर प्रश्नमंजुषा आणि इंट्रा कॉलेज अल्टरनेट जजमेंट लेखन स्पर्धा यांचा समावेश आहे.हा कार्यक्रम विधी शाखा, विधी आणि न्याय विभाग, महाराष्ट्र सरकार आणि नेपाळ लॉ कॅम्पस, त्रिभुवन विद्यापीठ, नेपाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे. 

आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात दिल्ली विद्यापीठ आणि नेपाळ लॉ कॅम्पसमधील नामांकित व्यक्ती मार्गदर्शन करतील.जजमेंट ॲनालिसिस स्पर्धेत संपूर्ण भारतातून 30 हून अधिक संघ सहभागी होत आहेत.या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्य शासनाच्या कायदा आणि न्याय विभागातील ड्राफ्ट्समन आणि सहसचिव सुप्रिया धावरे यांच्या हस्ते होणार आहे.तसेच समारोप कार्यक्रमास सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश पी.बी. वराळे उपस्थितीत राहणार आहेत. 

हा कार्यक्रम फर्ग्यूसन महाविद्यालयांच्या कॅम्पस मधील कुंदनमल फिरोदिया सभागृहात होणार आहे.सर्व विधी व इतर विद्याशाखामधील शिक्षक व विद्यार्थी ह्यांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या विकास समितीचे अध्यक्ष ॲड.अशोक पलांडे व प्राचार्या डॉ. सुनीता आढाव यांनी केले आहे.