राष्ट्रीय एकात्मतेसाठी धर्मसहिष्णुता टिकणे गरजेचे : प्रा. प्रदीप कदम

राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व वाघोली येथील भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय एकात्मतेसाठी धर्मसहिष्णुता टिकणे गरजेचे : प्रा. प्रदीप कदम
Sahitya Sammelan

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राष्ट्रीय एकात्मतेसाठी (National Unity) धर्मसहिष्णुता आणि सामाजिक समता टिकवून ठेवणे गरजेचे आहे,’ असे लेखक प्रा. प्रदीप कदम (Pradeep Kadam) यांनी धर्ममैत्री विचारवेध साहित्य संमेलनात (Sahitya Sammelan) व्यक्त केले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद व वाघोली येथील भारतीय जैन संघटनेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

शिक्षणविषयक ताज्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा. http://eduvarta.com/

प्रा. कदम हे संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचे उद्घाटन डॉ. अशोक पगारिया यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बीजेएस प्रकल्प व्यवस्थापक सुरेश साळुंके, शंकर आथरे यांनी मार्गदर्शन केले. संमेलनाची सुरुवात धर्ममैत्री प्रबोधन यात्रा आणि ग्रंथदिंडीने झाली. संमेलनात डॉ. संजय गायकवाड यांना ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रज्ञावंत पुरस्कार’ आणि विद्यार्थ्यांना ‘बंधुता गुणवंत विद्यार्थी पुरस्कार’, कवींना ‘बंधुता काव्यप्रतिभा पुरस्कार’ तर शिक्षकांना ‘बंधुता गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. मनोहर जाधव यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रकाश रोकडे समारोपप्रसंगी बोलताना म्हणाले की, ‘थोर समाजसुधारकांनी समाजाला माणुसकीची शिकवण दिल्यामुळे समाज मानवतावादाकडे जाऊ लागला. आजही त्या महापुरुषांचे विचार समाजपरिवर्तनाच्या दृष्टीने प्रेरणादायी आहेत.’

संमेलनात शंकर आथरे यांच्या ‘बंधुतेचे विस्तीर्ण क्षितिज’, मधुराणी बनसोड यांच्या ‘सन्मार्ग’ काव्यसंग्रह तर डॉ. सिद्धेश्वर गायकवाड यांच्या ‘मराठी नाटकों के हिंदी रुपांतरण का अनुवादपरक अनुशीलन’ या ग्रंथाचे प्रकाशन झाले. कवी चंद्रकांत वानखेडे, मधुश्री ओव्हाळ, डॉ. बंडोपंत कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगिता झिंजुरके तर आभार डॉ. सहदेव चव्हाण यांनी मानले.