टप्पा अनुदानासाठी पट पडताळणी शिबिर; तालुकानिहाय तीन दिवस होणार तपासणी
संच मान्यतेसाठी दि. ५ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर अशी तीन दिवसाच्या कालावधीत पट पडताळणी शिबिराचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषद पुणे माध्यमिक शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राचार्य/मुख्याध्यापक पत्राद्वारे कळवले आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
टप्पा अनुदानासाठी शैक्षणिक वर्ष २०२४- २५ ची (Academic year 2024-25) संच मान्यता (Set approval) आवश्यक आहे. त्यासाठी पुणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाची पटपडताळणी शिबिर येत्या ५ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत (Fold Verification Camp) आयोजन केले आहे. या बाबतचे पत्रक पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने (Zilla Parishad Pune Secondary Education Department) प्रसिद्ध केले आहे.
पुणे जिल्ह्यातील अंशतः अनुदानित (२० टक्के, ४० टक्के, ६० टक्के) उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची पट पडताळणी होणार आहे. कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता प्राप्त व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) राज्यातील अनुदानासाठी पात्र ठरलेल्या व वेतन अनुदानाचा टप्पा घेत असलेल्या उच्च माध्यमिक शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पामंजूर करणेबाबत आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
संचालनालयाच्या निर्देशानुसार दि ३० सप्टेंबर २०२४ ची पटसंख्या ग्राह्य धरण्यात यावी, संच मान्यतेमध्ये ज्या विद्यार्थ्यांची आधार क्रमांकाची पडताळणी पूर्ण झालेली आहे. त्यांचाच विचार केला जाणार आहे. उच्च माध्यमिक शाळांनी शंभर टक्के आधार व्हॅलिडेशन पूर्ण करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील उच्च माध्यमिक महाविद्यालयांची पट पडताळणी शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.
येत्या मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत पुणे शहर, खेड, शिरूर, जुन्नर, वेल्हे या तालुक्यांमध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत इंदापूर. बारामती, पुरंदर , दौंड,, हवेली, आंबेगाव या तालुक्यांचा समावेश असणार आहे. तर गुरूवार दि.७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मावळ, मुळशी, भोर, पिंपरी चिंचवडचा समावेश असणार आहे. मॉडर्न जुनियर कॉलेज पोलीस लाईन समोर शिवाजीनगर पुणे या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरास अंशतः अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालयांनी सोबतच्या प्र पत्रातील माहिती तीन प्रतीमध्ये सादर करणे आवश्यक आहे. तसेच शिबिरास येताना जनरल रजिस्टर, वर्ग तुकडी मान्यता आदेश, दाखले फाईल आधार व्हॅलिडेशन रिपोर्ट, विद्यार्थी हजेरी पत्र, संबंधित शाळेने सोबत दिलेले हमीपत्र यांची पडताळणी होणार आहे. याबाबीच्या अनुषंगाने रेकॉर्ड, दि. १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतचे विद्यार्थी बायोमॅट्रिक उपस्थिति प्रिंट घेऊन प्राचार्य / मुख्याध्यापक व लिपिक यांनी नियोजित दिनांकास वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद पुणे माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील शाळांना करण्यात आले आहे.