वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना विमा क्षेत्रात संधीची दालने :  डॉ. संजय माळी

विमा व्यवसायात विमा संसाधन व्यवस्थापक, जाहिरात, विमा दाव्यांची पुर्तता, विमा संख्याशास्त्रज्ञ, सेवा व्यवस्थापक, सायबर विमा, विक्री व विपणन अशा अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत.

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना विमा क्षेत्रात संधीची दालने :  डॉ. संजय माळी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यासाठी(commerce student) विमा क्षेत्रात अगणित संधी (Opportunities in insurance sector)उपलब्ध आहेत. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (Insurance Regulatory and Development Authority of India)२०४७ पर्यंत भारतातील संपुर्ण लोकसंख्येचा विमा उतरविण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे अर्थातच विमा व्यवसायाची वाढ होऊन रोजगाराच्या अगणित संधी उपलब्ध होणार आहेत, असे मत नॅशनल इन्शुरन्स ॲकॅडमीचे प्राचार्य डॉ. संजय माळी (Principal of National Insurance Academy Dr Sanjay Mali)यांनी व्यक्त केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डी. एस. सावकार अध्यासन व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विमा व्यवसायातील संधी या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी  विमा व्यवसायातील संधी या विषयावरील व्याख्यानात माळी बोलत होते. या प्रसंगी डी. एस. सावकार अध्यासन प्रमुख डॉ. अशोक कांबळे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. डॉ. जी श्यामला, विखे पाटील अध्यासन प्रमुख प्रा. डॉ. अनिल करंजकर आदी उपस्थित होते.

डॉ. माळी म्हणाले,  विमा व्यवसायात विमा संसाधन व्यवस्थापक, जाहिरात, विमा दाव्यांची पुर्तता, विमा संख्याशास्त्रज्ञ, सेवा व्यवस्थापक, सायबर विमा, विक्री व विपणन अशा अनेक क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत.

कार्यक्रमास विद्यार्थ्याचा अतिशय चांगला प्रतिसाद लाभला. याप्रसंगी डॉ. अशोक कांबळे यांनी सुरूवातीस डी.एस सावकार अध्यासन या शैक्षणिक वर्षात राबविणार असणाऱ्या उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली. वाणिज्य विभागाच्या विभागप्रमुख प्रा. डॉ. श्यामला यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रदीप खराटे यानी पाहुण्याची ओळख करून दिली. नेहा जाधव यांनी आभार मानले.