आत्तापर्यंत राज्यातील दोन लाख 40 हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; विद्यार्थ्यांची संख्या वाढत जाणार
दुष्काळग्रस्त कुटुंबांतील विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा आर्थिक भार पडू नये,म्हणून विभागाने तातडीने निर्णय घेतला. शुल्कमाफीची प्रक्रिया अजून सुरू असून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही.”
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घेतला असून राज्यातील तब्बल दोन लाख 40 हजार विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ झाले असल्याची माहिती राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली. तसेच त्यात वाढ होणार असल्याचे सांगितले.
राज्यातील 26 विद्यापीठांच्या परीक्षा नियंत्रकांची आढावा बैठक राज्याच्या उच्च शिक्षण संचालक कार्यालयातर्फे घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांच्या शुल्क माफी बाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क अचानक आले होते.अशा विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
डॉ. देवळाणकर म्हणाले, मुंबई विद्यापीठातर्फे सुमारे अडीच कोटी रुपये शुल्क रिफंड केले जाणार आहेत. त्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 65 हजार 200 शुल्क विद्यार्थ्यांना परत दिले आहेत. तर मुंबई विद्यापीठातील चार हजार दोनशे विद्यार्थ्यांना शुल्क परत देण्यात आले आहे. त्यात दररोज वाढ होईल.
-------------------
"दुष्काळाच्या संकटात कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये, ही शासनाची भूमिका आहे. म्हणूनच पावणे दोन लाख विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करून विभाग त्यांच्या पाठीशी उभा आहे. दुष्काळग्रस्त कुटुंबांतील विद्यार्थ्यांवर परीक्षा शुल्काचा आर्थिक भार पडू नये,म्हणून विभागाने तातडीने निर्णय घेतला. शुल्कमाफीची प्रक्रिया अजून सुरू असून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही.”
— चंद्रकांत दादा पाटील, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री
-----------
ज्या अनुदानित महाविद्यालयातील प्राचार्यांनी सीएचबी अध्यापकांची देयके अद्याप सहसंचालक कार्यालयात सादर केलेली नाहीत,त्यांना विनाविलंब कारणे दाखवा नोटीस बजावावी. तसेच, त्यांचे वेतन थांबवण्या संदर्भात कार्यवाही करावी.संबंधित नोटिसांच्या प्रती व कार्यवाहीचा अहवाल त्वरित संचालनालयाला सादर करावा.या प्रकरणात कोणतीही दिरंगाई,दुर्लक्ष अथवा कसूर खपवून घेतली जाणार नाही. सणासुदीच्या काळात CHB अध्यापकांची देयके रखडणार नाहीत,याची दक्षता घ्यावी.कार्यवाहीत टाळाटाळ झाल्यास संबंधित सहसंचालकांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल.प्रत्येकाने तातडीने कार्यवाही करून अनुपालन नोंदवावे.
- -डॉ. शैलेंद्र देवळाणकर
संचालक उच्च शिक्षण
--------------