इनोव्हेट यु टेकॅथॉन २.० हॅकेथॉन नोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

ही स्पर्धा ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या आयओआयटी महाविद्यालयात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आज बुधवारी ५ फेब्रुवारीपर्यंत होती.

इनोव्हेट यु टेकॅथॉन २.० हॅकेथॉन नोंदणीला १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण संकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठबळ देण्याच्या उद्देशाने 'इनोव्हेशन फाऊंडेशन'च्या वतीने 'इनोव्हेट यु टेकॅथॉन २.०' या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉनच्या दुसऱ्या पर्वाचे आयोजन पुण्यात २२ आणि २३ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सोडवून, त्याचे सोल्युशन समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या हॅकेथॉनच्या नोंदणीला देशभरातील अभियांत्रिकी महविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून आतापर्यंत २०० संघाची नोंदणी पूर्ण झाली आहे. अनेक विद्यार्थी नोंदणीच्या प्रक्रियेत असल्याने, खास विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार हॅकेथॉनच्या नोंदणीला येत्या सोमवारी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिल्याची माहिती इनोव्हेशन फाउंडेशनचे संस्थापक कल्पेश यादव यांनी बुधवारी दिली.

या स्पर्धेला एआयएसएसएमएस आयओआयटी महाविद्यालयाचे सहकार्य लाभले आहे. या हॅकेथॉनच्या विजेत्यांना सुमारे ७.५ लाख रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येईल.ही स्पर्धा ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीच्या आयओआयटी महाविद्यालयात ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आज बुधवारी ५ फेब्रुवारीपर्यंत होती. मात्र, विविध कारणास्तव विद्यार्थ्याना नोंदणी करता आलेली नाही. अशा देशभरातील विद्यार्थ्यांनी इनोव्हेशन फाउंडेशनशी संपर्क साधून नोंदणीला मुदतवाढ देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. या विद्यार्थ्यांच्या विनंतीला मान देऊन, हॅकेथॉनमध्ये सहभागी होण्यासाठी १० फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना innovateyou.in/hackathon या लिंकचा वापर करता येईल. नोंदणी करताना तांत्रिक अडचण निर्माण आल्यास विद्यार्थी 9689742929, 9623337777, 8390038371 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील उद्यमशीलतेला पाठिंबा देण्यासाठी ही स्पर्धा होत आहे. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी व्हावे. त्यासाठी प्राचार्य आणि पालकांनी पुढाकार घ्यावा.नोंदणी केल्यानंतर स्पर्धकांना रजिस्ट्रेशन किट देण्यात येईल. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे आवाहन कल्पेश यादव यांनी केले आहे.
.....