5th and 8th Exams : पाचवीसाठी 50 तर आठवीसाठी 60 गुणांची परीक्षा ; नापास झाल्यास त्याच वर्गात 

पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात पास होण्यासाठी 18 तर आठवीच्या विद्यार्थ्यांना 21 गुण मिळवावे लागणार आहेत.

5th and 8th Exams : पाचवीसाठी 50 तर आठवीसाठी 60 गुणांची परीक्षा ; नापास झाल्यास त्याच वर्गात 
5th and 8th Exams

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

5th and 8th Student Exam News : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता पाचवी आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या वार्षिक परीक्षेच्या संदर्भातील मूल्यमापन पद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात पास होण्यासाठी 18  तर आठवीच्या विद्यार्थ्यांना 21 गुण मिळवावे लागणार आहेत. विद्यार्थी नापास झाल्यास त्याला त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. या अंमलबजावणीस चालू शैक्षणिक वर्षापासूनच सुरूवात होणार आहे. 

शिक्षण हक्क कायद्यात बदल (Right to Education Act) करण्यात आला असून 'आता इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थी नापास होणार नाही' ही संकल्पना  बदलण्यात आली आहे. इयत्ता पाचवी , आठवीच्या विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाची परीक्षा घेऊन परीक्षा अखेरीस प्रत्येक विषयामध्ये अपेक्षित अध्ययन संपादणूक त्यांनी प्राप्त केले आहे किंवा नाही, याची खात्री केली जाणार आहे. विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाल्यास त्याला पुनर्परीक्षेची संधी दिली जाणार आहे. विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाची सवय लावणे आणि पुढील शैक्षणिक आव्हानांना व स्पर्धा परीक्षांना (Competitive Examination) सामोरे जाण्यासाठी तयार करणे,  या उद्देशाने परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

हेही वाचा : Savitribai Phule Pune University : आविष्कार संशोधन स्पर्धेची तारीख बदलली

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांची 10  गुणांची प्रात्यक्षिक / तोंडी परीक्षा तर 40 गुणांची लेखी परीक्षा अशी एकूण 50  गुणांची परीक्षा घेतली जाईल तर आठवीच्या विद्यार्थ्यांचे 10 गुणांची प्रात्यक्षिक/ तोंडी परीक्षा आणि 50  गुणांची लेखी, अशी एकूण 60 गुणांची परीक्षा घेतली जाईल. इयत्ता पाचवीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, परिसर अभ्यास या विषयांचा समावेश असेल. तर इयत्ता आठवीच्या वार्षिक परीक्षेत प्रथम भाषा, द्वितीय भाषा, तृतीय भाषा, गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

वार्षिक परीक्षा साधारणपणे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात शाळा स्तरावर घेतली जाईल. या विद्यार्थ्यांचा निकाल इतर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबर जाहीर केला जाईल. विद्यार्थी वार्षिक परीक्षेत नापास झाल्यास दोन महिन्यांनी त्यांची पुनर्परीक्षा घेतली जाईल. त्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास पुढील वर्गात प्रवेश दिला जाईल. मात्र, नापास झाल्यास त्याच वर्गात ठेवले जाईल.