UGC NET परीक्षेचे 'हे' हॉलतिकीट प्रसिद्ध

एजन्सीने अधिकृत सूचनेत म्हटले आहे की, '२१ जानेवारी २०२५ आणि २७ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या UGC-NET डिसेंबर २०२४ परीक्षेचे हॉलतिकीट प्रसिद्ध झाले आहेत. उमेदवारांना त्यांचे प्रवेशपत्र अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून वेबसाइटवरून हमीपत्रासह डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.'

UGC NET परीक्षेचे 'हे' हॉलतिकीट प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (National Testing Agency) NTA  ने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर 21 आणि 27 जानेवारी रोजी होणार्‍या UGC NET परीक्षेचे हॉलतिकीट प्रसिद्ध केले आहे. (Admit card for UGC NET exam to be held on January 21 and 27 has been released) या परीक्षेला बसणारे उमेदवार https://ugcnet.nta.ac.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन त्यांचे हॉलतिकीट डाउनलोड करू शकतात.

एजन्सीने अधिकृत सूचनेत म्हटले आहे की, '२१ जानेवारी २०२५ आणि २७ जानेवारी २०२५ रोजी होणाऱ्या UGC-NET डिसेंबर २०२४ परीक्षेचे हॉलतिकीट प्रसिद्ध झाले आहेत. उमेदवारांना त्यांचे हॉलतिकीट अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून वेबसाइटवरून हमीपत्रासह डाउनलोड करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.'

या परीक्षा ३, ६, ७, ८, ९, १०, १५ आणि १६ जानेवारी रोजी होणार होत्या. परंतु, संक्रात या सणामुळे 15 आणि 16 जानेवारी रोजी होणार्‍या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या परीक्षा आता 21 आणि 27 जानेवारी रोजी होणार आहेत. या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी एजन्सीला विद्यार्थ्यांकडून निवेदन देण्यात आले होते. 

भारतीय ज्ञान प्रणाली, मल्याळम, उर्दू, कामगार कल्याण, वैयक्तिक व्यवस्थापन, औद्योगिक संबंध, कामगार आणि समाज कल्याण, मानव संसाधन व्यवस्थापन, गुन्हेगारीशास्त्र, आदिवासी आणि प्रादेशिक भाषा/साहित्य, लोकसाहित्य, कोकणी आणि पर्यावरण विज्ञान या विषयांच्या परीक्षा 21 जानेवारीला सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहेत. 

२७ जानेवारी रोजी, संध्याकाळी 3 ते 6 च्या  शिफ्टमध्ये  संस्कृत, जनसंवाद आणि पत्रकारिता, जपानी, कला सादरीकरण - नृत्य/नाटक/नाट्य, इलेक्ट्रॉनिक विज्ञान, महिला अभ्यास, कायदा आणि नेपाळी या विषयांच्या परीक्षा होणार आहेत. 

UGC NET परीक्षेचे हॉलतिकीट डाउनलोड करण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in. जा. होमपेजवर उपलब्ध असलेल्या UGC NET हॉलतिकीट डाउनलोड लिंकवर क्लिक करा. लॉगिन क्रेडेन्शियल्स सबमिट करा. स्क्रीनवर UGC NET हॉलतिकीट दिसेल. हॉलतिकीट पहा आणि डाउनलोड करा.