'माझ्या मुलीला मृत घोषित करा', बेपत्ता भारतीय वंशाची विद्यार्थिनी सुधीक्षाच्या पालकांची विनंती
डोमिनिकन रिपब्लिकमध्ये तिच्या मित्र मैत्रिणींसोबत सुट्टी घालवताना ती बेपत्ता झाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अमेरिका आणि कॅरिबियन देशातील पोलिस एकत्रित काम करत आहेत. अमेरिकन न्यूज एजन्सीने डोमिनिकन रिपब्लिक नॅशनल पोलिसांचे प्रवक्ते दिएगो पेस्क्वेरा यांच्या हवाल्याने सांगितले की, "कोनांकीच्या कुटुंबाने एजन्सीला एक पत्र पाठवून तिच्या मृत्यूची घोषणा करण्याची विनंती केली होती.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
डोमिनिकन रिपब्लिकमध्ये (Dominican Republic) बेपत्ता झालेल्या २० वर्षीय भारतीय वंशाची विद्यार्थिनी सुधीक्षा कोनानकीच्या (Sudhiksha Konanaki, a 20-year-old Indian-origin student who went missing) कुटुंबाने पोलिसांना त्यांच्या मुलीला मृत घोषित करण्याची विनंती केली आहे. अमेरिकन माध्यमांमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. भारतीय वंशाचे अमेरिकन नागरिक असलेले कोनांकी यांना शेवटचे ६ मार्च रोजी पुंता काना शहरातील रिउ रिपब्लिक रिसॉर्टमध्ये पाहिले गेले होते.
डोमिनिकन रिपब्लिकमध्ये तिच्या मित्र मैत्रिणींसोबत सुट्टी घालवताना ती बेपत्ता झाली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अमेरिका आणि कॅरिबियन देशातील पोलिस एकत्रित काम करत आहेत. अमेरिकन न्यूज एजन्सीने डोमिनिकन रिपब्लिक नॅशनल पोलिसांचे प्रवक्ते दिएगो पेस्क्वेरा यांच्या हवाल्याने सांगितले की, "कोनांकीच्या कुटुंबाने एजन्सीला एक पत्र पाठवून तिच्या मृत्यूची घोषणा करण्याची विनंती केली होती. सोमवारी रात्री कोनांकी कुटुंबाकडून करण्यात आलेल्या विनंतीला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
सुधीक्षाला जोशुआ स्टीव्हन रिबे या अमेरिकन युवकासोबत शेवटचे पाहण्यात आले होते. ६ मार्च रोजी सकाळी पुंता काना समुद्रकिनाऱ्यावरून सुधीक्षा बेपत्ता झाली होती. ती बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी आसपासचा परिसर, समुद्र किनारी तिची शोधाशोध केली, मात्र अद्याप तिचा शोध लागलेला नाही. दरम्यान सुधीक्षाच्या पालकांनी स्थानिक सरकारला निवेदन पाठवून सुधीक्षाला मृत घोषित करण्याची विनंती केली आहे.
चौकशी दरम्यान, जोशुआने सांगितले की तो समुद्रकिनाऱ्यावर सुधीक्षा सोबत दारू पीत होता. समुद्राच्या लाटेत तो वाहत गेला. आपला जीव वाचवून तो जेव्हा समुद्र किनार्यावर परत आला तेव्हा सुधीक्षा बेपत्ता असल्याचे त्याच्या लक्षात आले. या प्रकरणी जोशुआला संशयित आरोपी म्हणून घोषित करण्यात आले होते कालांतराने त्याला निर्दोष केले गेले.