SSC CGL टियर I २०२४ परीक्षेचा निकाल जाहीर

या संदर्भात आयोगाने अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. यानुसार, ६०९ अतिरिक्त उमेदवारांची यादी करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना आता २० जानेवारी २०२५ रोजी होणार्‍या  टियर II परीक्षेत  हजर राहावे लागेल.  उमेदवार आज १८ जानेवारी रोजी संध्याकाळी ७:०० वाजेपासून परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. 

SSC CGL टियर I २०२४ परीक्षेचा निकाल जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

स्टाफ सिलेक्शन कमिश (staff selection commission) SSC ने CGL टियर I २०२४ परीक्षेचा अतिरिक्त निकाल जाहीर केला आहे. (CGL Tier I 2024 exam additional result has been declared) हे निकाल आयोगाने ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहेत. परीक्षेला बसलेले उमेदवार पोर्टलला भेट देऊन आपला निकाल तपासू शकतात. यशस्वी झालेल्या उमेदवारांना परीक्षेच्या पुढील टप्प्यात म्हणजेच टियर २ परीक्षेत उपस्थित राहावे लागेल.

या संदर्भात आयोगाने अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. यानुसार, ६०९ अतिरिक्त उमेदवारांची यादी करण्यात आली आहे. या सर्व उमेदवारांना आता २० जानेवारी २०२५ रोजी होणार्‍या टियर II परीक्षेत हजर राहावे लागेल. उमेदवार आज १८ जानेवारी रोजी संध्याकाळी ७:०० वाजेपासून परीक्षेसाठी प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील. 
CGL टियर I अतिरिक्त निकाल तपासण्यासाठी, सर्वप्रथम उमेदवारांना https://ssc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. आता, होमपेजवरील SSC CGL टियर १ अतिरिक्त निकाल लिंकवर क्लिक करा आणि एक नवीन पृष्ठ उघडेल. आता, पृष्ठावर उपलब्ध असलेल्या SSC CGL 2024 टियर I अतिरिक्त निकाल यादीवर क्लिक करा. रोल नंबर तपासा आणि तो डाउनलोड करा. आता पुढील गरजेसाठी त्याची हार्ड कॉपी तुमच्याकडे ठेवा.