RRB पॅरामेडिकल भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

आरआरबीने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या तारखेच्या १० दिवस आधी सर्व उमेदवारांसाठी परीक्षा शहर सूचना स्लिप अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. उमेदवार त्यांचे लॉगिन तपशील प्रविष्ट करून ते डाउनलोड करू शकतील.  परीक्षेच्या तारखेच्या ४ दिवस आधी सर्व अर्जदारांना आरआरबीकडून प्रवेशपत्र जारी केले जाईल. 

RRB पॅरामेडिकल भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

रेल्वे भरती मंडळाने (Railway Recruitment Board) RRB पॅरा मेडिकल श्रेणी (Paramedical category) (CEN 04/2024 पॅरामेडिकल) भरतीसाठी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. (Exam schedule for recruitment announced) परीक्षेच्या तारखेबाबतची अधिसूचना रेल्वे भरती मंडळाच्या  अधिकृत वेबसाइट rrbcdg.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, पॅरामेडिकल पदांसाठी संगणक आधारित परीक्षा RRB द्वारे २८ ते ३० एप्रिल २०२५ (३ दिवस) दरम्यान देशभरातील निर्धारित परीक्षा केंद्रांवर घेतली जाईल.
आरआरबीने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या तारखेच्या १० दिवस आधी सर्व उमेदवारांसाठी परीक्षा शहर सूचना स्लिप अधिकृत वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून दिली जाईल. उमेदवार त्यांचे लॉगिन तपशील प्रविष्ट करून ते डाउनलोड करू शकतील. 
परीक्षेच्या तारखेच्या ४ दिवस आधी सर्व अर्जदारांना आरआरबीकडून प्रवेशपत्र जारी केले जाईल.  परीक्षेच्या दिवशी, उमेदवारांनी प्रवेशपत्र आणि वैध मूळ ओळखपत्र (आधार कार्ड/पॅन कार्ड/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स) परीक्षा केंद्रावर घेऊन जाणे आवश्यक आहे. प्रवेशपत्राशिवाय तुम्हाला परीक्षा हॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
आरआरबी पॅरामेडिकल भरती सीबीटी परीक्षेत, उमेदवारांना १०० बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील. प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण दिला जातो. प्रश्नपत्रिकेत व्यावसायिक क्षमता विषयातून ७० प्रश्न, सामान्य जागरूकता विषयातून १० प्रश्न, सामान्य अंकगणित, सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र विषयातून १० प्रश्न आणि सामान्य विज्ञान विषयातून १० प्रश्न विचारले जातील.