रेल्वेमध्ये ४००० हून अधिक पदांसाठी रिक्त जागांसाठी भरती सुरू
या भरती प्रक्रियेअंतर्गत, विविध ट्रेडमध्ये शिकाऊ उमेदवारांची पदे भरली जाणार आहे. यामध्ये एअर कंडिशनिंग, सुतार, डिझेल मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, फिटर, पेंटर, वेल्डर इत्यादींसह इतर व्यवसायांचा समावेश आहे. या मोहिमेद्वारे एकूण ४२३२ पदे भरली जाणार आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून दहावी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण केलेली असावी. संबंधित विषयातील आयटीआय प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील व्यक्तींना नियमांनुसार वयात सूट दिली जाईल. सामान्य/ओबीसी/ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांना १०० रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी/पीएच आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क नसेल.
विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. निवड गुणवत्ता यादीवर आधारित असेल, जी दहावी आणि आयटीआयच्या गुणांवर आधारित असेल. यानंतर, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी केली जाईल.