"NTA स्वयम"चा निकाल जाहीर

सध्या  जुलै महिन्यातील एकूण ४५९ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत, या  सर्व विषयांच्या परीक्षा  सीबीटी मोडमध्ये घेण्यात आल्या होत्या. तर  हायब्रिड मोडमध्ये घेतलेल्या उर्वरित परीक्षांचे निकाल स्वतंत्रपणे जाहीर केले जातील.

"NTA स्वयम"चा निकाल जाहीर
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 
नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (National Testing Agency) एनटीए स्टडी वेब्स ऑफ अ‍ॅक्टिव्ह-लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड्स (Study Webs of Active-Learning for Young Aspiring Minds) स्वयम जून २०२४ च्या सेमिस्टर परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. (SWAYAM June 2024 semester exam results have been announced) डिसेंबरमध्ये झालेल्या या परीक्षेत बसलेले विद्यार्थी (students) exam.nta.ac.in/swayam या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे निकाल तपासू आणि डाउनलोड करू शकतील.

देशभरातील २४९ शहरांमधील २७० परीक्षा केंद्रांवर ५१७ पेपरसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. भाषेचा पेपर वगळता इतर विषयांच्या  प्रश्नपत्रिका इंग्रजीमध्ये होत्या. अधिकृत अधिसूचनेनुसार ७, ८, १४ आणि १५ डिसेंबर रोजी ८ सत्रांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा संगणक आधारित चाचणी (CBT) मोडमध्ये आणि हायब्रिड मोडमध्ये अशा दोन्ही पद्धतीने घेण्यात आली होती. 

सध्या जुलै महिन्यातील एकूण ४५९ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले आहेत, या सर्व विषयांच्या परीक्षा सीबीटी मोडमध्ये घेण्यात आल्या होत्या. तर हायब्रिड मोडमध्ये घेतलेल्या उर्वरित परीक्षांचे निकाल स्वतंत्रपणे जाहीर केले जातील,अशी माहिती एनटीएने दिली आहे.