आता लष्करातील 'या' वरिष्ठ अधिकार्यांची देखील तपासली जाणार गुणवत्ता
हे नवीन धोरण लष्कराच्या सहा ऑपरेशनल कमांड, एका ट्रेनिंग कमांडचे व्हाईस चीफ आणि कमांडर इन चीफ यांना लागू होणार नाही. भारतीय सैन्यात अंदाजे 11 लाख सैनिक आहेत. आणि 90 हून अधिक लेफ्टनंट जनरल, 300 मेजर जनरल आणि 1,200 ब्रिगेडियर आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
भारतीय लष्कराने आपल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. (The Indian Army has made a major change in the promotion rules for its officers) लष्कर आता थिएटर कमांड सिस्टम सुरू करण्याच्या तयारीत आहे, ज्या अंतर्गत आता सर्व लेफ्टनंट जनरल्सची गुणवत्ता यादी त्यांच्या कामगिरीच्या आधारे तयार केली जाईल. (A merit list of all Lieutenant Generals will be prepared based on their performance) ही नवीन प्रणाली 31 मार्च 2025 पासून लागू केली जाईल.
भारतीय लष्कराचे हे नवीन धोरण वार्षिक गोपनीय अहवाल (ACR) फॉर्म अंतर्गत लेफ्टनंट जनरल्ससाठी लागू होईल. मीडिया रिपोर्टनुसार हे नवीन धोरण लष्कराच्या सहा ऑपरेशनल कमांड, एका ट्रेनिंग कमांडचे व्हाईस चीफ आणि कमांडर इन चीफ यांना लागू होणार नाही. भारतीय सैन्यात अंदाजे 11 लाख सैनिक आहेत आणि 90 हून अधिक लेफ्टनंट जनरल, 300 मेजर जनरल आणि 1 हजार 200 ब्रिगेडियर आहेत.
भारतीय वायुसेना आणि नौदलात पदोन्नतीसाठी रँक आधारित मूल्यमापन प्रणाली आधीच अस्तित्वात आहे. आता लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये पदोन्नतीबाबत एकसमान नियम करण्यात आला आहे. अहवालानुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, "पूर्वी लेफ्टनंट जनरल स्तरावर गुणवत्ता प्रणाली नव्हती, आता त्यांना 1 ते 9 च्या स्केलवर वेगवेगळ्या कामांच्या आधारे श्रेणीबद्ध केले जाईल. ज्येष्ठतेच्या ऐवजी गुणवत्तेला प्राधान्य दिले जाईल."