GATE परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
अधिकृत वेळापत्रकानुसार, परीक्षा १ ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घेतल्या जातील. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिल्या शिफ्टची वेळ सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० अशी निश्चित करण्यात आली आहे. तर, दुसरी शिफ्ट दुपारी २:३० ते ५:३० या वेळेत होईल.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
आयआयटी रुरकीने (IIT Roorkee) विविध पदव्युत्तर आणि डॉक्टरेट कार्यक्रमांसाठी अभियांत्रिकी पदवीधर अभियोग्यता चाचणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. (The schedule for the Engineering Graduate Aptitude Test for postgraduate and doctoral programs has been announced) परीक्षेला बसणारे सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइट gate2025.iitr.ac.in ला भेट देऊन परीक्षेचे वेळापत्रक पाहू शकतात.
अधिकृत वेळापत्रकानुसार, परीक्षा १ ते १६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घेतल्या जातील. ही परीक्षा दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिल्या शिफ्टची वेळ सकाळी ९:३० ते दुपारी १२:३० अशी निश्चित करण्यात आली आहे. तर, दुसरी शिफ्ट दुपारी २:३० ते ५:३० या वेळेत होईल. उमेदवार शाखानिहाय परीक्षेच्या वेळापत्रकासाठी अधिकृत वेबसाइटला बेट देऊ शकतात.
आयआयटी रुरकीने गेट परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र आधीच जारी केले आहे. संस्थेने ७ जानेवारी रोजी अधिकृत वेबसाइट gate2025.iitr.ac.in वर GATE परीक्षेचे प्रवेशपत्र अपलोड केले होते. गेट २०२५ चा निकाल १९ मार्च रोजी जाहीर होणार आहे. स्कोअरकार्ड २८ मार्च ते ३१ मे पर्यंत डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध असतील. निकाल जाहीर झाल्यापासून तीन वर्षांसाठी स्कोअरकार्ड वैध असेल.