शिवाजी खांडेकरांच्या नेतृत्वाखाली शिक्षकेतर पतपेढीची निवडणूक दुसऱ्यांदा बिनविरोध
शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी ए.डी.देशपांडे यांनी जाहीर केले.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
पुणे माध्यमिक शाळा शिक्षकेतर सहकारी पतपेढीची पंचवार्षिक २०२३-२४ ते २०२८-२९ ची निवडणूक प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांच्या नियंत्रणाखाली जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पार पडली. शिवाजी खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक अधिकारी ए.डी.देशपांडे यांनी जाहीर केले. पतपेढीचे सर्वच १३ संचालक बिनविरोध निवडून आले.
हेही वाचा : विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप मिळाली; पण बॅंकेत जमा नाही झाली
निवडून आलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे :
प्रसन्न कोतुळकर (चोक्सी हायस्कूल), शिवाजी खांडेकर(रावसाहेब पटवर्धन हायस्कूल), देवेंद्र पारखे ( नु.म.वि.प्रशाला), विलास चव्हाण (दादा गुजर माध्यमिक विद्यालय), बसप्पा जवारी (कलमाडी हायस्कूल), सुनील पदम (एस.व्ही.एस. हायस्कूल), गणपत लांघी (रमणबाग प्रशाला), अनिल हनमघर (गोपाळ हायस्कूल), मेधा गोऱ्हे (आपटे प्रशाला), कौमुदी येवलेकर (सेंट हिल्डास हायस्कूल), राजेश कांबळे (महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल), सतिश घाणेकर (सुंदरदेवी राठी हायस्कूल), ज्ञानेश्वर मरळे (महाराष्ट्र विद्यालय).
महाराष्ट्रातील माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची स्वतंत्र अशा एकमेव असलेल्या या पतपेढीची स्थापना १९७८ साली झाली. पतपेढीच्या ४५ वर्षाच्या इतिहासात सलग दुसऱ्यांदा संचालक मंडळ बिनविरोध निवडून आल्याबद्दल सर्व सभासदांचे पतपेढीचे विद्यमान कार्याध्यक्ष शिवाजी खांडेकर यांनी आभार मानले. गेल्या ५ वर्षाचा कालावधी अत्यंत कठीण होता. नोट बंदी, आर्थिक मंदी, कोराना कालावधी अशी अनेक संकटांवर मात करत पतपेढी प्रगतीकडे वाटचाल करत आहे, असे देखील खांडेकर यांनी सांगितले.
पतपेढीचे सर्व सभासद व हितचिंतक यांच्या सहकार्यानेच पतपेढी सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करीत आहे. पतपेढीचे संस्थापक, आजी माजी संचालक व सभासद यांचे मोठे योगदान आहे, असे पतपेढीचे विद्यमान चेअरमन प्रसन्न कोतुळकर व विद्यमान सचिव देवेंद्र पारखे यांनी सांगितले.