विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यात आता अडचण येणार नाही; कारण...

बी.ए., बी.कॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रापासून उद्योगाचे प्रशिक्षण मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थी त्यांच्या आवडत्या क्षेत्रांचाही प्रशिक्षणात समावेश करू शकतात.

विद्यार्थ्यांना रोजगार मिळवण्यात आता अडचण येणार नाही; कारण...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पदवीधर विद्यार्थ्यांना यापुढे पदवीनंतर रोजगार मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही. विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि रोजगारक्षमतेतील अंतर भरून काढण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (University Grants Commission) UGC अप्रेंटिसशिप कार्यक्रम (Apprenticeship program) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर UGC ने  जानेवारी 2025 च्या सत्रापासून (From January 2025 session) पदवीपूर्व कार्यक्रमांच्या विद्यार्थ्यांसाठी (For students of undergraduate programs) 'अप्रैंटिसशिप एबेंडेड डिग्री' (Apprenticeship Abandoned Degree) AED कार्यक्रमास मान्यता दिली आहे.

यामध्ये बी.ए., बी.कॉम, बीएस्सी (B.A., B.Com, B.Sc) या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रापासून उद्योगाचे प्रशिक्षण मिळणार आहे. याशिवाय विद्यार्थी त्यांच्या आवडत्या क्षेत्रांचाही प्रशिक्षणात समावेश करू शकतात.

यूजीसीचे अध्यक्ष प्रोफेसर एम जगदीश कुमार (UGC Chairman Professor M Jagdish Kumar) यांनी सांगितले की, "३ ऑक्टोबर रोजी झालेल्या आयोगाच्या बैठकीत AED कार्यक्रमाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा मसुदा लवकरच राज्ये आणि विद्यापीठांना पाठवला जाईल. AED चे उद्दिष्ट पदवीपूर्व अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेतील अंतर भरून काढणे आहे."

"किंबहुना पुस्तकी अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेतील दरीही भरून काढून  त्यांना बाजारपेठेच्या मागणीतील नव्या युगातील कौशल्यांसाठी तयार करावे लागेल. यामुळे त्यांना त्यांची पदवी पूर्ण करण्यापूर्वी रोजगार उपलब्ध होईल. हा प्रशिक्षणार्थी कार्यक्रम जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता सुधारणे, प्रात्यक्षिक प्रशिक्षण, उद्योगांच्या गरजेनुसार अभ्यासक्रम तयार करणे आदींवर भर दिला जाणार आहे," असेही ते म्हणाले. 

पहिल्या सेमिस्टरमध्ये कॉलेजमध्ये शिकावे लागेल. यानंतर, उद्योगातील शिकाऊ कार्यक्रम दुसऱ्या सत्रात सुरू होईल. विद्यार्थी त्याच्या आवडीचा विषय निवडून त्याचे प्रशिक्षण घेऊ शकतो. उदाहरणार्थ, उद्योगाव्यतिरिक्त, विद्यार्थी राजकारणी, वकील, आयुक्त कार्यालयातील प्रशिक्षणार्थी कार्यक्रमात देखील सामील होऊ शकतो. तीन वर्षांच्या पदवी कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना किमान एक सत्र या कार्यक्रमासाठी द्यावा  लागेल आणि चार वर्षांच्या पदवी कार्यक्रमातील विद्यार्थ्यांना  किमान दोन सत्र द्यावे लागतील.

याशिवाय शेवटचे सत्र प्रशिक्षणार्थी कार्यक्रमाचे असेल. दुसऱ्या सेमिस्टरपासून जास्तीत जास्त 50 टक्के कालावधीसाठी प्रशिक्षणार्थी कार्यक्रम असेल. नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क नुसार, 30 तासांच्या प्रशिक्षणासाठी 1 क्रेडिट आणि एक वर्षाच्या प्रशिक्षणार्थी प्रशिक्षणासाठी किमान 40 क्रेडिट दिले जातील.