धक्कादायक : 70 हजारात 1200 जणांना फेक मेडिकल डिग्री देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

या टोळीने तब्बल 1 हजार 200 जणांना फेक डिग्रीचे वाटप केले असून त्यातील एक आठवी पास आहे. आत्तापर्यंत बाराशे जणांना बनावट मेडिकल प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

धक्कादायक : 70 हजारात 1200 जणांना फेक मेडिकल डिग्री देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

तब्बल 32 वर्षांपासून अल्पशिक्षित बेरोजगारांना बनावट मेडिकलची डिग्री (Fake medical degrees to the unemployed)देणाऱ्या टोळीचा पर्दा फाश (Exposing the gang)झाला आहे. गुजरात मधील सुरत (Surat in Gujarat)मधून बनावट वैद्यकीय डीग्री देणाऱ्या टोळीच्या प्रमुखांना अटक करण्यात आली आहे. या टोळीने तब्बल 1 हजार 200 जणांना फेक डिग्रीचे (Fake degree)वाटप केले असून त्यातील एक आठवी पास आहे. आत्तापर्यंत बाराशे जणांना बनावट मेडिकल प्रमाणपत्र दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

गुजरात पोलिसांनी अटक केलेल्या डॉक्टर रमेश गुजराती याने 1990 च्या दशकात बी एच एम एस मध्ये शिक्षण घेतले. त्याने वेगवेगळ्या ट्रस्टमध्ये काम करण्यास सुरुवात केली. परंतु, फारसा फायदा होत नसल्याचे दिसून आल्यानंतर त्याने इलेक्ट्रो होमिओपॅथिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. केंद्र सरकार केव्हा राज्य सरकारने इलेक्ट्रो होमिओपॅथीसाठी कोणतेही नियम लागू केले नाही. त्यामुळे या क्षेत्रात काम करणारी टोळी निर्माण झाली.

इलेक्ट्रो होमिओपॅथीसाठी कोणतेही नियम आणि कायदे अस्तित्वात नाहीत. हे समजल्यानंतर रमेश गुजरातीने या अभ्यासक्रमाची पदवी देण्यासाठी मंडळ स्थापन करण्याची योजना तयार केली. त्यासाठी पाच जणांना कामावर ठेवण्यात आले. त्यांना इलेक्ट्रो होमिओपॅथीचे प्रशिक्षण दिले गेले. त्यांना इलेक्ट्रो होमिओपॅथी औषध आहे लिहिण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अनेकांना तीन ऐवजी दोन वर्षात प्रमाणपत्र देण्याचा घाट घालण्यात आला. 70 हजार रुपये भरल्यानंतर पंधरा दिवसात प्रमाणपत्र दिले जाऊ लागले.  त्यासाठी बनावट वेबसाईटही तयार करण्यात आली.

या टोळीचा मुख्य म्होरक्या डॉ. रमेश गुजराती आणि बी के रावत आहेत. त्यांच्याकडून शेकडो अर्ज आणि प्रमाणपत्रे पोलिसांनी जप्त केले आहेत. त्यांनी बॅचलर ऑफ इलेक्ट्रो होमिओपॅथी मेडिसिन आणि सर्जरीचे प्रमाणपत्र पैसे देणाऱ्या अनेकांना विकल्याचे समोर आले आहे. त्यांनी सुरत मधील डॉक्टरांना दिलेले प्रमाणपत्र पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये बनावट असल्याचे आढळून आले. एका बनावट डॉक्टरने केलेल्या उपचारामुळे एका मुलीचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी आत्तापर्यंत 13 जणांना अटक केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Eduvarta News (@eduvarta_news)