‘या’ दिवशी मिळणार समाज कल्याणमार्फत घेतलेल्या परीक्षांच्या उत्तरतालिका!
वर्ग - 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गासाठीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
समाज कल्याण आयुक्तालयामार्फत (Social Welfare Commissionerate) विविध संवर्गातील परीक्षा (Examinations in various categories) ४ मार्च ते १९ मार्च २०२५ दरम्यान राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावर पार पडल्या. या परीक्षेदरम्यान उमेदवारांनी सादर केलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने येत्या २४ मार्च ते २८ मार्च या कालावधीत उत्तरतालिका (Answer Sheet) उमेदवारांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.
वर्ग - 3 संवर्गातील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल/अधीक्षक (महिला), गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण), समाज कल्याण निरीक्षक, उच्चश्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या संवर्गासाठीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
उमेदवारांना या उत्तरतालिकेबाबत काही सूचना किंवा आक्षेप असल्यास त्यांना त्या ऑनलाईन पध्दतीने २४ ते २८ मार्च याच कालावधीत नोंदविता येतील. उमेदवारांना सूचना किंवा आक्षेप नोंदवण्यासाठी प्रति प्रश्न शुल्क रक्कम रु. १००/- ऑनलाईन पध्दतीने भरणा करणे आवश्यक असेल.
दरम्यान, उमेदवारांनी केलेल्या सूचना/आक्षेप संदर्भात कोणताही पत्रव्यवहार आयुक्त कार्यालयास लेखी अथवा ई-मेल द्वारे स्विकारला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी असे आवाहन समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.