पदवीधारकांना नोकरीची संधी; 'महापारेषण'मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू 

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी अंतर्गत विविध पदांच्या तब्बल शेकडो रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार राज्य विद्युत मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ https://www.mahatransco.in/career/active  जाऊन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ एप्रिल 2025 पर्यंत देण्यात आली आहे.

पदवीधारकांना नोकरीची संधी; 'महापारेषण'मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company) अंतर्गत विविध पदांच्या तब्बल शेकडो रिक्त जागा (260 vacancies for various posts) भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध (Advertisement published) करण्यात आली आहे. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवार राज्य विद्युत मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ https://www.mahatransco.in/career/active  जाऊन अर्ज भरू शकतात. अर्ज करण्याची अंतिम मुदत ३ एप्रिल 2025 पर्यंत देण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित अंतर्गत अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर, कराड, पुणे, वाशी अशी सात परिमंडल कार्यालये व ऐरोली येथे राज्य भार प्रेषण केंद्र आहे. त्यापैकी सात परिमंडल कार्यालयांच्या कार्यक्षेत्रात वेगवेगळी मंडल कार्यालये आहेत. त्या मंडल कार्यालयांतर्गत येणाऱ्या वेतनगट ३ मधील मंडल स्तरीय सेवाजेष्ठतेतील निम्नस्तर लिपीक (वित्त व लेखा) ही रिक्त पदे एकत्रित करून सरळसेवेद्वारे अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीमोहिमेअंतर्गत एकूण २६० रिक्त पदे भरली जाणार आहेत. 

या पदासाठी शैक्षणिक अर्हता वाणिज्य शाखेतील पदवी बी.कॉम. व एमएस-सीआयटी परीक्षा उत्तीर्ण ही पात्रता आहे. या पदासाठी अनुभवाची गरज नाही. अर्ज सादर करण्यासाठी ३ एप्रिलपर्यंत संबंधित शैक्षणिक अर्हता संपादित केलेली असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे व कमाल वय ३८ वर्षे असावे. वयोमर्यादेसाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास वर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा ५ वर्षांनी शिथिल राहील. माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांचा सैनिकी सेवेचा कालावधी अधिक तीन वर्षे इतका राहील. दिव्यांग उमेदवारांसाठी सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहणार आहे.

या पदभरतीसाठी १५० गुणांची ऑनलाइन परीक्षा राज्यातील विविध केंद्रावर ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी ६००, तर अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३०० रुपये शुल्क ठेवण्यात आले. भरतीसंदर्भात अधिक माहितीसाठी http://www.mahatransco.in या महापारेषणच्या अधिकृत संकेतस्थळला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.