हवाई दलात 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

अर्ज प्रक्रिया हवाई दलाच्या indianairforce.nic.in या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे.

हवाई दलात 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी हवाई दलात नवीन संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय वायुसेनेने (Indian Air Force) लोअर डिव्हिजन क्लर्कच्या (LDC) पदांसाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या होत्या. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया (Recruitment process) हवाई दलाच्या indianairforce.nic.in  या अधिकृत वेबसाइटवर सुरू झाली आहे. ही भरती हवाई दलाच्या विविध युनिट्स/स्टेशन्ससाठी असणार आहे. 

हवाई दलात लोअर डिव्हिजन क्लर्क होण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण केलेली असावी. याशिवाय उमेदवारांच्या इंग्रजी टायपिंगचा वेग 35 शब्द प्रति मिनिट आणि हिंदी टायपिंगचा वेग 30 शब्द प्रति मिनिट असावा. यासाठी उमेदवारांची कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे. उमेदवार भरतीच्या अधिकृत अधिसूचनेमधून पात्रतेशी संबंधित इतर तपशील तपासू शकतात. 

हवाई दलाच्या या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे असावे. अर्जाच्या शेवटच्या तारखेनुसार वयाची गणना केली जाईल. मात्र, उच्च वयोमर्यादा OBC उमेदवारांसाठी 03 वर्षे, SC/ST उमेदवारांसाठी 05 वर्षे आणि PH उमेदवारांसाठी 10 वर्षे शिथिल करण्यात आली आहे.

किमान पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांनुसार उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी निवडले जाईल. यामध्ये कौशल्य चाचणी ही केवळ पात्रता आहे. लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) भरती परीक्षेत, सामान्य बुद्धिमत्ता, इंग्रजी, संख्यात्मक योग्यता आणि सामान्य जागरूकता या विषयांवर प्रश्न विचारले जातात. या भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात. लोअर डिव्हिजन क्लर्क (LDC) पदासाठी निवड झाल्यानंतर, उमेदवारांना स्तर-2 नुसार वेतन दिले जाईल.