खाजगी क्लासेस पोलिसांच्या रडारवर, कडक कारवाई करण्याचा आयुक्तांचा इशारा

परीक्षा पुढे ढकला, एमपीएससी, यूपीएससी आयोगाच्या विविध धोरणात्मक निर्णयाबाबत टीका करण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांकडून वारंवार आंदोलन करत नागरिकांसह पोलिसांना वेठीस धरले जात आहे. त्याबरोबरच स्पर्धा परीक्षेशी काही संबंध नसताना देखील काही जण आंदोलन भडकवत आहे. त्यामुळे आंदोलन भडकवणारेही यानिमित्ताने रडारवर आले आहेत.

खाजगी क्लासेस पोलिसांच्या रडारवर, कडक कारवाई करण्याचा आयुक्तांचा इशारा

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

एमपीएससीसह (Maharashtra Public Service Commission) स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी (Competitive exam students) चार दिवसांपूर्वी केलेले आंदोलन क्लास चालकांना भोवणार असल्याचे दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यास काही स्पर्धा परीक्षा केंद्र चालक (Competitive Exam Class Instructor) प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यानंतर क्लास चालकांची बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिका प्रशासनाची परवानगी, तसेच अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता न करता क्लास सुरू असेल तर क्लासेसवर कडक कारवाई करणार असल्याचा इशारा पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Pune Police Commissioner Amitesh Kumar) यांनी दिला. 

चार दिवसांपूर्वी मध्यरात्री अलका चौकात, फारसखाना पोलीस ठाण्याच्या आवारात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. परीक्षा पुढे ढकला, एमपीएससी, यूपीएससी आयोगाच्या विविध धोरणात्मक निर्णयाबाबत टीका करण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांकडून वारंवार आंदोलन करत नागरिकांसह पोलिसांना वेठीस धरले जात आहे. त्याबरोबरच स्पर्धा परीक्षेशी काही संबंध नसताना देखील काही जण आंदोलन भडकवत आहे. त्यामुळे आंदोलन भडकवणारेही यानिमित्ताने रडारवर आले आहेत.

पुण्यातील काही स्पर्धा परीक्षा क्लास चालकांकडून विविध नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता न घेणे, अग्निशमक दल, महापालिका, स्थानिक पोलिसांची परवानगी नसणे, यासह विविध परवानगीची तपासणी मोहीम आम्ही सुरू केली आहे. नियमबाह्य क्लासचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती  पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
__________________________________________

पुण्यात MPSC उमेदवारांचे वारंवार आंदोलन होत असताना आता अवैधपणे सुरू असणारे MPSC आणि स्पर्धा परीक्षेचे क्लास पोलिसांच्या रडार वर आले आहेत. विविध कारणांनी या क्लासचालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. उमेदवारांच्या सुरक्षा व्यवस्थेत चूक असल्यास, जसे की फायर ऑडिट आणि इतर गोष्टी. तसेच खोटी प्रलोभने देणारी आणि विद्यार्थ्यांनी दिशाभूल करून लुटणाऱ्या क्लास चालकांवर कारवाई केल्यास त्याचे स्वागतच असेल.

- स्पर्धा परीक्षा समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य