पालकांनो...आरटीईचा अर्ज चुकल्यास डिलिट करा अन्यथा...

आरटीईची ऑनलाइन प्रवेश अर्ज प्रक्रिया दि. १४ जानेवारीपासून सुरू झाली आहे. त्यामुळे अर्ज करताना पालकांना विशेषतः राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता व गुगल लोकेशन तपासून पाहावे लागणार आहे.

पालकांनो...आरटीईचा अर्ज चुकल्यास डिलिट करा अन्यथा...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आरटीई (राइट टू एज्युकेशन (RTE)) अंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली असून पालकही आपल्या पाल्याचा प्रवेश घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. अशातच शिक्षण विभागाने (Department of Education) अर्ज भरताना अधिक दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामध्ये एका पाल्याने जर दोनवेळा अर्ज केला तर तो थेट प्रवेश प्रक्रियेतून बाद (If a child applies twice, he/she will be disqualified from the direct admission process) करण्यात येणार आहे. त्यामुळे पालकांना एकदाच प्रवेश अर्ज करावा (Apply for admission only once) लागणार आहे. त्यामुळे पालकांना अधिक तत्परतेने आणि दक्ष राहून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

दरम्यान, आरटीईची ऑनलाइन प्रवेश अर्ज प्रक्रिया दि. 14 जानेवारीपासून सुरू झाली आहे. त्यामुळे अर्ज करताना पालकांना विशेषतः राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता व गुगल लोकेशन तपासून पाहावे लागणार आहे.

अर्ज चुकल्यास डिलिट करा अन्यथा...

समजा, आपल्या पाल्याचा अर्ज चुकला तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा लागेल आणि नव्याने अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे. चुकीचा अर्ज सबमिट झाल्यास तो बाद केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पहिला अर्ज चुकला आणि म्हणून दुसरा अर्ज सबमिट केला हा प्रकार ग्राह्य धरला जाणार नसल्याने पालकांनी अर्ज काळजीपूर्वक भरून तपासून मगच सबमिट करावा.