युवकांना इंटर्नशिपची मोठी संधी; 'पीएम इंटर्नशिप पोर्टल' सुरू
या योजनेंतर्गत, विद्यार्थ्यांना भारतातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये १२ महिन्यांची म्हणजेच एक वर्षाची इंटर्नशिपची संधी दिली जाईल.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
युवकांना आता इंटर्नशिपसाठी कंपन्यांमध्ये फेर्या माराव्या लागणार नाहीत. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या इंटर्नशिप कार्यक्रमामुळे (Internship program) तरुणांना विविध क्षेत्रात व्यावहारिक अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे. आज, म्हणजे 3 ऑक्टोबर (3 october) रोजी, 'पीएम इंटर्नशिप पोर्टल' (PM Internship portal ) सुरू केले जाणार आहे. या योजनेंतर्गत, विद्यार्थ्यांना भारतातील टॉप ५०० कंपन्यांमध्ये (Top 500 companies) १२ महिन्यांची म्हणजेच एक वर्षाची इंटर्नशिपची (one year Internship) संधी दिली जाईल. विद्यार्थ्यांना या पोर्टलवर 12 ऑक्टोबर नंतर नोंदणी करावी लागेल. या योजनेअंतर्गत, निवडलेल्या सर्व अर्जदारांना भारत सरकारकडून मासिक स्टायपेंड आणि आर्थिक सहाय्य मिळेल. या योजनेचा 1 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमांतर्गत, शालेय शिक्षण पूर्ण केलेले सर्व विद्यार्थी इंटर्नशिपसाठी पात्र असतील.
केवळ 21 ते 24 वयोगटातील उमेदवार या योजनेअंतर्गत अर्ज करण्यास पात्र आहेत. अर्जदाराच्या कुटुंबातील पालकांचे सर्व स्रोतांमधून वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. कुटुंबात सरकारी कर्मचारी असले तरी उमेदवार त्यासाठी पात्र ठरणार नाहीत. ज्या लोकांकडे IIT किंवा IIM सारख्या प्रतिष्ठित विद्यापीठांमधून पदवी आहे किंवा CMA किंवा CA सारखी प्रमाणपत्रे आहेत. ते देखील अपात्र ठरतील.
इंटर्नशिप पोर्टलच्या ग्राहक सेवा केंद्रानुसार, 10वी-12वी उत्तीर्ण, डिप्लोमा, ग्रॅज्युएशन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आणि कौशल्य केंद्रातील युवक या योजनेअंतर्गत सहभागी होऊ शकतात. अर्ज करणारा उमेदवार जर पदवी अभ्यासक्रमाचा नियमित विद्यार्थी असेल किंवा पदव्युत्तर पदवी घेत असेल, तर असे उमेदवारही या पोर्टलवर अर्ज karnyas पात्र नसतील.
इंटर्नला सरकार दरमहा 4,500 रुपये स्टायपेंड देईल कंपन्या त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) फंडातून अतिरिक्त 500 रुपयांचे योगदान देतील.याचा अर्थ उमेदवाराला इंटर्नशिप मिळाल्यानंतर 5000 रुपये मासिक स्टायपेंड दिले जाईल.