ले छलांग 'हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पना साकार करण्याची संधी!

महिला सशक्तीकरण करण्यासाठी त्यांना व्यावसायिक एक उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण करण्याची संधीही याद्वारे मिळणार आहे. ऑक्टॅथॉन म्हणजे ८ तासात स्पर्धकाने एखाद्या समस्येचे समाधान शोधून काढून त्याचे प्रारूप तयार करावयाचे आहे.

ले छलांग 'हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू'च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या कल्पना साकार करण्याची संधी!

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

विद्यार्थ्यांमध्ये इनोव्हेशन, इन्क्युबेशन आणि इनव्हेंशनची संस्कृती वाढविण्याच्या दृष्टिने (To foster a culture of innovation, incubation and invention among students.) एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे (MIT World Peace University) ले छलांग 'हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू' २०२५ (Le Chhalang 'Hack MIT-WPU' 2025) ही तीन दिवसीय स्पर्धा (A three-day tournament) २६ ते २८ मार्च २०२५ या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतःची कल्पना साकार करून त्याला मूर्तरूप देण्याची संधी (An opportunity for students to realize and materialize their own ideas) देण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटीचे संस्थापक विश्वस्त व एमआयटी टीबीआयचे संचालक प्रा. प्रकाश बी. जोशी, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस व प्र कुलगुरू, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मिलिंद पांडे व ब्लू ओशन स्टील्सचे सीईओ डॉ. पंकज जैन यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  

याबरोबरच, महिला सशक्तीकरण करण्यासाठी त्यांना व्यावसायिक एक उत्कृष्ट व्यासपीठ निर्माण करण्याची संधीही याद्वारे मिळणार आहे. ऑक्टॅथॉन म्हणजे ८ तासात स्पर्धकाने एखाद्या समस्येचे समाधान शोधून काढून त्याचे प्रारूप तयार करावयाचे आहे.

ही स्पर्धा तृतीय, चतुर्थ, यूजी, पीजी व पीएचडीच्या विद्यार्थ्यांमध्ये होणार आहे. यात आयडियाथॉन, वाथॉन, फॉर्माथॉन, बायो-थॉन, डिझाइनथॉन, हॅक-एआय-थॉन, आणि ऑक्टॅथॉन या गटात होणार असून या सर्व गटांसाठी एकूण ८५४ समस्या विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. त्यासाठी ४६८ मेंटॉर नियुक्त करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी व्यावसायीक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्ती, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या स्टार्टअपच्या क्षेत्रातील प्रमुख व्यक्ती व विद्यापीठाचे माजी विद्यार्थी हे ज्यूरी म्हणून उपस्थित राहतील व मार्गदर्शन करतील. यामध्ये वैज्ञानिक व अवैज्ञानिक असे शेकडो समस्या स्टेटमेंट्स हे विविध कंपन्यांकडून प्राप्त झाले  आहेत.

दरम्यान, अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान, आरोग्य, बिजनेस अॅण्ड लिडरशीप, आर्टस, ह्यूमॅनिटीस अॅड प्रोफेशनल्स स्टडिज, सार्वजनिक आरोग्य इ. क्षेत्रातील ७ हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. प्रत्येक गटातील प्रथम दोन विजेत्यांना रोख पारितोषिके व मेडेल देण्यात येणार आहेत. तसेच स्टार्टअप फंडिंग सुद्धा देण्यात येणार आहे.

याबरोबरच ले छलांग 'हॅक एमआयटी-डब्ल्यूपीयू' २०२५ मध्ये एमआयटी डब्ल्यूपीयूचे विद्यार्थी १०० पेक्षा अधिक स्टार्टअपचे प्रदर्शन आयोजित करणार आहेत. जे पाहण्यासाठी सर्वांना निःशुल्क असेल. एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष डॉ.राहुल विश्वनाथ कराड यांच्या को क्रिएशन या संकल्पनेवर आधारित प्रथम वर्षाच्या ५०० विद्यार्थ्यांनी ले छलांगमध्ये सहभाग नोंदविला आहे.

-----------------------------------------

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये उद्योजकतेला खतपाणी घालण्यासाठी नवनिर्मिती आणि नवीन संकल्पना आत्मसात करण्याची वेळ आली आहे. या स्पर्धेतून नवे उद्योजक निर्माण होऊन देश प्रगतीपथावर जाईल.

- डॉ. आर.एम.चिटणीस

--------------------------------------

'माइंड टू मार्केट' आणि 'पेपर टू प्रोडक्ट' ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी ही स्पर्धा महत्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव देऊन त्याला चालना दयावी व त्यांची बौध्दिक क्षमता वृद्धिंगत करून त्यांना उद्योजक बनविण्याचे धोरण प्रत्यक्षात आणण्याचा हा एक स्तुत्य प्रयत्न आहे. देशात नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणाऱ्यांची संख्या वाढवायची आहे. आत्मनिर्भर भारत आणि स्टार्ट अप इंडिया संस्कृती वाढविण्यासाठी या स्पर्धेतून मदत होणार आहे. या स्पर्धेसाठी अनेक कंपन्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून त्यांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्याचे व त्यांच्या प्रोजेक्टला सक्रिय मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

- डॉ. मिलिंद पांडे