ICAI CA Result : सीए परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, असा पाहा निकाल

सीए फायनलमध्ये अहमदाबादमधील अक्षय जैन हा ८०० पैकी ६१६ गुण मिळवत देशात अव्वल ठरला आहे. तर सीए इंटर परीक्षेत हैद्राबाद येथील वाय गोकुळे साई श्रीकरने ८०० पैकी ६८८ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.  

ICAI CA Result : सीए परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर, असा पाहा निकाल
ICAI CA Final Inter Result 2023

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

ICAI CA Final Inter Result 2023 : इन्स्टिट्यूट ऑफ चार्चर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाच्या वतीने सीए परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. सीए परीक्षेत ८.३३ टक्के तर इंटर परीक्षेत १०.२४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.  

विद्यार्थी आपला निकाल icai.nic.in या संकेतस्थळावर पाहू शकतील. सीए फायनलमध्ये अहमदाबादमधील अक्षय जैन हा ८०० पैकी ६१६ गुण मिळवत देशात अव्वल ठरला आहे. तर सीए इंटर परीक्षेत हैद्राबाद येथील वाय गोकुळे साई श्रीकरने ८०० पैकी ६८८ गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.  

PSI 2020 Result : पीएसआयचा रखडलेला निकाल अखेर जाहीर; EWS च्या ६५ पदांचा निकाल राखीव

CA च्या अंतिम परीक्षेला १.४ लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते, तर १.८ लाखांहून अधिक विद्यार्थी CA इंटरमिजिएट परीक्षेला साले होते. CA परीक्षेत जुना अभ्यासक्रम (गट १) आणि नवीन अभ्यासक्रम (गट २) म्हणून ओळखले जाणारे दोन गट आहेत, ज्यासाठी परीक्षा वेगवेगळ्या तारखांना घेण्यात आल्या.

गट १ साठी ICAI CA इंटर कोर्स परीक्षा ३, ६, ८ आणि १० मे रोजी आयोजित करण्यात आली होती. गट २ ची परीक्षा १२, १४, १६ आणि १८ मे रोजी घेण्यात आली होती. तर गट १ साठी अंतिम अभ्यासक्रमाची परीक्षा २, ४, ७ आणि ९ मे रोजी घेण्यात आली होती. गट ३ ची परीक्षा ११, १३, १५ आणि १७ मे रोजी घेण्यात आली होती. 

ITI Admission : बंद तुकड्यांना पसंतीक्रम दिला नाही ना? दुरुस्तीसाठी उरले आठ दिवस

असा करा ICAI CA अंतिम निकाल डाउनलोड

* उमेदवारांनी सर्वप्रथम icai.nic.in या अधिकृत वेबसाइटवर जावे

* निकालाच्या लिंकवर क्लिक करा.

* आपले लॉगिन तपशील प्रविष्ट करा आणि सबमिट करा.

* निकाल तपासा आणि डाउनलोड करा.

* प्रिंटआऊट काढा

शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.

https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD