अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, दिल्लीहून शासन आदेश प्रसिद्ध

मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यासंदर्भातला हवा असलेला शासन आदेश दिल्लीहून निघाला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सावंत यांच्याकडे हा आदेश सोपवला आहे.

अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, दिल्लीहून शासन आदेश प्रसिद्ध

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा (Classical language status) प्राप्त झाला आहे. त्यासंदर्भातला हवा असलेला शासन आदेश दिल्लीहून निघाला (Government order published) आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत (Gajendra Shekhawat) यांनी राज्याचे मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सावंत (Uday Samant) यांच्याकडे हा आदेश सोपवला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर त्याची अधिसूचना तात्काळ काढावी यासाठी दिल्लीत बैठक पार पडली. शेखावत त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीला सदानंद मोरे आणि ज्ञानेश्वर मुळे बैठकीला उपस्थित होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची घोषणा झाली असली तरी अधिसूचना न निघाल्याने त्यासंदर्भात ही बैठक होती, अशी माहिती मंत्री सामंत यांनी दिली.  

आज आम्ही केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची भेट घेतली. त्यांनी अभिजात भाषेसाठीची अधिसूचना आमच्याकडे सुपूर्द केली आहे. यासाठी मी त्यांचे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आभार मानतो, असे सामंत म्हणाले."उदय सामंत यांनी या अधिसूचनेला ऐतिहासिक म्हणत सांगितले की, "हा एक अनोखा योगायोग आहे. ११ वर्षांपूर्वी, जेव्हा हा प्रस्ताव पाठवला गेला, तेव्हा मी मराठी भाषेचा राज्यमंत्री होतो. आज, अभिजात भाषेसाठीचा शासन आदेश हाती मिळाला तेव्हा मी मराठी भाषेचा कॅबिनेट मंत्री आहे." त्यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर या GR च्या आगमनाला खास महत्त्व असल्याचे नमूद केले.

अभिजात भाषेसाठी हे आहेत निकष 

केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने 2004 साली काही नियम तयार केले गेले. त्यानुसार एखाद्या भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी त्या भाषेतील ग्रंथांची पुरातनता आणि हजार वर्षांच्या इतिहासाची नोंद असणे गरजेचे असते. प्राचीन साहित्य/ग्रंथांचा एक भाग, ज्याला वक्त्यांच्या पिढ्यांकडून मौल्यवान वारसा म्हणून गणले जाते. त्याचबरोबर साहित्यिक परंपरा मूळ असली पाहीजे आणि दुसऱ्या भाषेतून घेतलेली नसावी. या निकषावर अभिजात भाषा म्हणून ग्राह्य धरली जाते.

निकषात सुधारणा 

नोव्हेंबर 2005 मध्ये अभिजात भाषेच्या निकषात सुधारणा करण्यात आली. अभिजात भाषा ठरवण्यासाठी त्या भाषेचा इतिहास हा दीड ते दोन हजार वर्षे जुना असणे गरजेचे आहे. प्राचीन साहित्य/ग्रंथांचा एक भाग, ज्याला वक्त्यांच्या पिढ्यांकडून मौल्यवान वारसा म्हणून गणले जाते. दुसऱ्या भाषेतून सदर भाषा उसनी घेतलेली नसावी. तसेच त्याची एक स्वतंत्र साहित्य परंपरा असावी. प्राचीन भाषा आणि आधुनिक भाषेत फरक असणे गरजेचे आहे. या सर्व निकषानुसार मराठी भाषा पात्र ठरल्याने तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे.