अन्न व औषधे प्रशासकीय सेवा 'गट ब ' चा निकाल जाहीर
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या प्रशासकीय अधिकारी अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट ब, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभाग या पदाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC) घेण्यात आलेल्या प्रशासकीय अधिकारी अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट ब, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभाग पदाच्या मुलाखती 4 ऑक्टोबर रोजी घेण्यात आल्या होत्या. या संवर्गाचा निकाल (Results)नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात आठ उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
खुशाल वामनराव बंटे,दीपक दिलीप धायगुडे, ज्ञानेश्वर कौतिक संसारे, अरुण लक्ष्मणराव खरात, चंद्रकांत मधुकर कदम, ब्रम्हा रामदास चोपकर, प्रबोध निरंजनराव धांडे, जयकर मधुकरराव कर्णाळे अशी गुणवत्ता यादीतील उमेदवारांची नावे आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या प्रशासकीय अधिकारी अन्न व औषधे प्रशासकीय सेवा, गट ब, वैद्यकीय शिक्षण व औषधे द्रव्य विभाग या पदाचा निकाल https://mpsc.gov.in/results_merit_list/14 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.