मोफत शिक्षणाची संधी! 85 केंद्रीय विद्यालय व २८ नवोदय विद्यालयांना केंद्राची मंजूरी

देशभरात विविध राज्यांमध्ये 85 नवीन केंद्रीय विद्यालय तसेच 28 नवीन नवोदय विद्यालय उघडण्यास मंजूरी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती.

मोफत शिक्षणाची संधी! 85 केंद्रीय विद्यालय व २८ नवोदय विद्यालयांना केंद्राची मंजूरी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

केंद्रीय मंत्रिमंडळाची नुसतीच एक बैठक पार पडली. यावेळी देशभरात विविध राज्यांमध्ये 85 नवीन केंद्रीय विद्यालय तसेच 28 नवीन नवोदय विद्यालय उघडण्यास मंजूरी (Approval for 85 new Kendriya Vidyalayas and 28 new Navodaya Vidyalayas) देण्यात आली आहे. या विषयी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव (Central Minister Ashwini Vaishnav)यांनी एक्स या आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर ही माहिती प्रसिद्ध केली आहे. 

केंद्राने घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील 82 हजार विद्यार्थ्यांना मोफत उच्च दर्जाच्या शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात त्याबाबत माहिती नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने (CCEA) 85 नवीन केंद्रीय विद्यालये (KVs) सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. 

पुढील शैक्षणिक वर्ष 2025-56-२६पासून 85 नवीन केंद्रीय विद्यालयांची स्थापना आणि सध्याच्या विद्यालयांच्या विस्तारासाठी सुमारे ५ हजार 872 कोटी रुपयांची आवश्यकता असून, सध्या सुरू असलेल्या अशा केंद्रीय विद्यालयांची संख्या १ हजार २५६ आहे. यातील तीन विद्यालये मास्को, काठमांडू आणि तेहरानमध्ये सुरू आहेत. या विद्यालयांत 13.56 लाख विद्यार्थी शिकत आहेत.

रोजगाराची संधी..

मागील निकषांनुसार, एक पूर्ण केंद्रीय विद्यालय विकसित करण्यासाठी 63 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. त्यानुसार 85 नवीन केंद्रीय विद्यालयांमध्ये 33 नवीन पदांच्या माध्यमातून एकूण 5 हजार 388 कायमस्वरूपी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शिक्षण होण्याची स्वप्न पाहणाऱ्या तरूणांची ही मोठी संधी आहे.