MPSC : गट-ब, व गट-क सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध; महत्त्वाचे बदल..

अर्ज करण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबर आहे. यंदा मात्र या दोन्ही परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गट-क व गट-ब परीक्षेच्या जाहिराती वेगवेगळ्या प्रसिद्ध झाल्या असून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा एकत्र न होता वेगवेगळ्या होणार आहेत.

MPSC : गट-ब, व गट-क सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध; महत्त्वाचे बदल..

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) गट- ब व गट-क सेवा पूर्व परीक्षेसाठी जाहिरात प्रसिद्ध (Advertisement released for Group-B and Group-C Pre-Service Examination) केली आहे. त्यानुसार अर्ज करण्याची अंतिम मुदत ४ नोव्हेंबर (Deadline November 4) आहे. यंदा मात्र या दोन्ही परीक्षेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. गट-क व गट-ब परीक्षेच्या जाहिराती वेगवेगळ्या प्रसिद्ध झाल्या असून महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा परीक्षेची पूर्व परीक्षा एकत्र न होता वेगवेगळ्या होणार आहेत. या दोन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम यापुर्वीच जाहीर करण्यात आला आहे.

प्रसिद्ध जाहिरातीनुसार गट-क अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक,तांत्रिक सहाय्यक,सहायक मोटार वाहन निरीक्षक पदांच्या एकूण 1 हजार 333 रिक्त जागा तर गट-ब अंतर्गत  सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या ४८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज प्रक्रिया १४ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून अंतिम मुदत ४ नोव्हेंबर देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही ५ जानेवारी २०२५ ला होणार आहे. ४८० पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. बहूप्रतिक्षित अशा पोलीस उपनिरीक्षक पदांचा यामध्ये समावेश आहे. यात सहायक कक्ष अधिकारी पदासाठी ५४, राज्य कर निरीक्षक २०९ आणि पोलीस उपनिरीक्षक २१६ पदांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.