11th Admission : विशेष फेरीची निवड यादी प्रसिध्द, २६ हजार विद्यार्थ्यांना प्रवेश
पुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती या महापालिकांच्या कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षण विभागाकडून (Education Department) राबविण्यात येत असलेल्या इयत्ता अकरावीच्या (11th Admission) केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत सोमवारी पहिल्या विशेष फेरीची निवड यादी (Selection List) जाहीर करण्यात आली. या फेरीमध्ये पुणे (Pune) व पिंपरी चिंचवडमध्ये (PCMC) सुमारे २६ हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या फेरीसाठी जवळपास २९ हजार विद्यार्थी पात्र ठरले होते. नियमित दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीच्या तुलनेत विशेष फेरीत सर्वाधिक विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
पुण्यासह मुंबई, नागपूर, नाशिक आणि अमरावती या महापालिकांच्या कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. तीन नियमित फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर सध्या विशेष फेरीची प्रक्रिया सुरू आहे. या फेरीसाठी जवळपास ६० हजार जागा उपलब्ध आहेत. त्यासाठी २८ हजार ९६२ विद्यार्थी पात्र ठरले होते. त्यापैकी पहिल्या दहा पसंतीक्रमानुसार २५ हजार ९७३ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे.
RTE Admission : शुल्क प्रतिपूर्ती रकमेत वाढ होणार की नाही? संस्थाचालक हवालदिल
पहिल्या पसंतीक्रमानुसार सर्वाधिक १९ हजार ६८२ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर दुसऱ्या पसंतीक्रमानुसार ३ हजार ४२४ आणि तिसऱ्या पसंतीक्रमानुसार १ हजार २१७ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले आहे. विज्ञान शाखेसाठी १४ हजार १३४ तर वाणिज्य शाखेसाठी ९ हजार ४७ विद्यार्थी आणि कला शाखेसाठी २ हजार १५४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
विशेष फेरीत कला शाखेचा खुल्या गटाचा सर्वाधिक कटऑफ ४६८ तर विज्ञान शाखेचा ४६४ एवढा आहे. दोन्ही शाखांसाठी फर्ग्यूसन महाविद्यालयाला पसंती मिळाली आहे. तर वाणिज्य शाखेचा सिम्बायोसिस महाविद्यालयात कटऑफ सर्वाधिक ४४७ एवढा आहे.
अकरावी प्रवेशाची स्थिती
फेरी | निवड झालेले विद्यार्थी | प्रत्यक्ष प्रवेश |
पहिली | ४२,२३२ | २३,०९३ |
दुसरी | २०,६०२ | ९,१४४ |
तिसरी | १४,७०८ | ५,३१२ |
विशेष | २५,९७३ | - |
शैक्षणिक बातम्यांचे अपडेट मिळविण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
https://chat.whatsapp.com/Ib9LP2jUnnXAQpcKKJ5nWD